गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद आणि आले पिकातील कंदकूज वर उपाय !
🌱हळद व आले या पिकांच्या शाकीय वाढीत निर्माण होणारी पानांची व फुटव्यांची संख्या यांचा उत्पादनवाढीमध्ये मोठा वाटा असतो. पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्यास या पिकात कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो. या पिकामध्ये कंदकूज प्रामुख्याने बुरशी किंवा जिवाणूंमुळे होते. कंदकूज बुरशीजन्य आहे की जिवाणूजन्य आहे ते सर्वप्रथम ओळखून नियंत्रण करावे.
🌱कंदकूज लक्षणे : कंदकुज चे प्रथम लक्षणे ही कंदातील कोवळ्या फुटींवर लगेच दिसून येतात. प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालपर्यंत वाळत जातात.खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डा वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. या रोगामुळे साधारण उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होते.
🌱बुरशीजन्य कंदकूज:
👉🏻प्रथम जमिनीमध्ये पाण्याचा योग्य निचरा ठेवावा तसेच प्रतिबंधासाठी नियोजन म्हणून जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा २ ते २.५ किलो प्रति एकर २५० ते ३०० किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून दीड महिन्याच्या अंतराने दोन ते तीन वेळा वापरावे.
👉🏻कंदकूजीस सुरवात झाल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड ८०० ते १००० ग्रॅम प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.
👉🏻रोगाची तीव्रता जास्त असल्यास, मेटॅलॅक्सिल (८%) + मॅंकोझेब (६४% डब्ल्यूपी) हे संयुक्त बुरशीनाशक ८०० ग्रॅम प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी. आळवणी करण्यापूर्वी जमिनीत वाफसा असावा.
🌱जीवाणूजन्य कंदकूज:
जीवाणूजन्य कंदकूज ओळखण्यासाठी रोगग्रस्त कंदाचा भाग धारदार ब्लेडने कापून स्वच्छ काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याचे टोक त्यामध्ये बुडवावे. त्यामधून दुधासारखा स्राव पाण्यामध्ये आल्यास जिवाणूजन्य कंदकूज आहे हे ओळखावे.
जीवाणूजन्य कंदकूज असल्यास स्ट्रेप्टोसायक्लीन ४०- ५० ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड ८०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.
🌱संदर्भ: अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.