AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळदीला मिळाला तब्बल ‘इतका’ उच्चांकी दर!
बाजार बातम्याmaharashtra times
हळदीला मिळाला तब्बल ‘इतका’ उच्चांकी दर!
➡️हळदीची देशभरातील प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या सांगलीत यंदाच्या नव्या हंगामातील सौद्यांना सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये हळदीच्या तीन हजार पोत्यांची आवक झाली, प्रति क्विंटल २२ हजार रुपयांचा उच्चांकी दर हळदीला मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.सांगलीतील हळदीची बाजारपेठ देशभर प्रसिद्ध आहे. ➡️उत्तम दर्जामुळे सांगलीतील हळदीची मोठ्या प्रमाणात जगभर निर्यात होते. हळदीच्या खरेदी-विक्रीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या करोनामुळे हळदीला अपेक्षित दर मिळाला नव्हता, त्यामुळे यंदा चांगला दर मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. ➡️ मार्केट यार्डमध्ये हळदीच्या पोत्यांचे पूजन करून गणरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर यंदाच्या हळद सौद्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सौद्याच्या प्रारंभीच हळदीला ११ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला.तर, उत्तम दर्जाच्या हळदीला प्रतिक्विंटल २२ हजार रुपयांचा दर मिळाला. ➡️चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच चांगला दर यापुढेही कायम राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे हळदीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी हळदीची आवक कमी होईल, असा अंदाज आहे. संदर्भ:-maharashtra times, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
3
इतर लेख