AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळदीला मिळाला उच्चांकी दर!
बाजार बातम्याsaamtv
हळदीला मिळाला उच्चांकी दर!
➡️ शेतकऱ्याच्या शेतातील पिवळ सोनं म्हणून ओळख असलेल्या हळदीला हिंगोली जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या शेवटी उच्चांकी दर मिळाला आहे. सध्या हिंगोलीत हळदीला ११ हजार ८६९ प्रति क्विंटल इतका दर मिळतोय. ➡️ हिंगोली बाजार समितीनंतर वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती हळदीच्या बाजारपेठेसाठी राज्यात ओळखली जाते. वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात आज झालेल्या हळदीच्या सौद्यात उच्चांकी ११ हजरा ८६९ रुपयांचा दर मिळाला आहे. तर काल हिंगोलीच्या मार्केट यार्डात देखील हळदीला चांगला दर मिळाला आहे. ➡️ हळदीचे उत्पादन झाल्यानंतर काही महिने हळदीचे भाव घसरले होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या या पिवळ्या सोन्याला सेनगाव आणि हिंगोलीच्या बाजार समितीमध्ये तब्बल ११,८६९ एवढा उच्चांकी दर मिळाला आहे. विक्रमी दर मिळाल्याने हळद उत्पादक बळीराजा मालामाल झाला आहे. वसमत बाजारपेठेत हळदीला उच्चांकी दर ➡️ राज्यात सांगली जिल्ह्यानंतर हिंगोली आणि त्यापाठोपाठ वसमत बाजारपेठेत हळदीला सध्या उच्चांकी दर मिळत आहे. हिंगोली बाजार समितीनंतर वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती हळदीच्या बाजारपेठेसाठी राज्यात ओळखली जाते. ➡️ मराठवाड्यासह विदर्भातून यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातून हिंगोलीच्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात हळद विक्रीला येते. संदर्भ:- saamtv, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
3
इतर लेख