AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळदीच्या भरघोस उत्पादनासाठी चांगल्या बेण्याची निवड महत्वाची!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळदीच्या भरघोस उत्पादनासाठी चांगल्या बेण्याची निवड महत्वाची!
• निवडलेल्या बेण्याची सुप्तावस्था संपलेली असावी. • बेण्यावरील एक ते दोन डोळे चांगले फुगलेले असावेत. • मातृकंद बेणे ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, तर हळकुंडे ३० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाची असावीत. • बेणे रोगमुक्त व कीडमुक्त असावे. • बेण्याची उगवण एकसारखी होण्यासाठी लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर बेण्यावरती पाणी मारावे. • बेण्यास कंदकुजीचा प्रादुर्भाव झाला असल्यास बेणे मऊ पडते. असे मऊ बेणे कापले असता आतमधील भाग कापसासारखा दिसतो. असे बेणे उगवत नाही बीजप्रक्रियेच्या द्रावणात तरंगते त्यामुळे असे बेणे बाजूला काढावे. • मातृकंद बेणे त्रिकोणाकृती असावे. • बेण्यामध्ये इतर जातींची भेसळ नसावी. • बेण्यावरील मुळ्या, गतवर्षीच्या पानाचे अवशेष साफ करून बियाणे स्वच्छ करावे. अशाप्रकारे काळजीपूर्वक हळद लागवडीसाठी बेणे निवडल्यास आपल्या उत्पादनात भर पडते.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
76
2