AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पेरणीचे नियोजन
गुरु ज्ञानAgroStar
हरभरा पेरणीचे नियोजन
👉हरभऱ्याच्या चांगल्या उत्पादनासाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडणे महत्त्वाचे आहे. पेरणीचा योग्य कालावधी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान आहे. लागवड पद्धत बियाणे पेरून किंवा टोबून या दोन्ही प्रकारे करता येते. पेरणी करताना, दोन ओळींमधील अंतर 30 सेंमी आणि दोन झाडांमधील अंतर 10 सेंमी ठेवावे. बियाणे 2 सेंमी पेक्षा जास्त खोलीवर जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा उगवण कमी होऊ शकते. 👉बियाण्याची एकसमान उगवण होण्यासाठी आणि सुरुवातीच्या अवस्थेत पिकाला बुरशीजन्य रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. यासाठी, मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्लूपी घटक असणारे **मँडोझ बुरशीनाशक** @3 ग्रॅम प्रति किलो बियाणे वापरावे. बीजप्रक्रियेने बियाण्यांचे संरक्षण होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे पिकाचे आरोग्य आणि उत्पादन दोन्ही सुधारतात. 👉या उपायांनी हरभऱ्याच्या पिकाचे चांगले व्यवस्थापन होईल आणि अपेक्षित उत्पादन मिळवता येईल. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
0
इतर लेख