AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पीक पेरणी विषयक माहिती!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पीक पेरणी विषयक माहिती!
• शेतकरी मित्रांनो, जिरायती हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. • जिरायती परिस्थितीत देशी हरभरा झाडांची हेक्टरी संख्या योग्य राखण्यासाठी बियाणे चार तास पाण्यात भिजवून व नंतर सावलीत वाळवून बीजप्रक्रिया करूनच पेरावे. • ओलिताखाली हरभरा ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरल्यास अधिक उत्पादन मिळते. काबुली हरभऱ्याची उशिरा पेरणी १० नोव्हेंबरच्या आसपास करावी. • देशी हरभऱ्याच्या पेरणीकरिता दोन ओळीतील अंतर ३० सें.मी., तर दोन झाडातील अंतर १० सें.मी ठेवावे. • काबुली वाणाकरिता दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडांतील अंतर १० सें.मी ठेवावे. • ओलिताखालील हरभऱ्याच्या पेरणीसाठी रुंद वाफ पद्धत वापरणे फायद्याचे ठरते. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
4