AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकातील मान कुजव्या रोगासाठी उपाययोजना!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पिकातील मान कुजव्या रोगासाठी उपाययोजना!
या रोगाचा प्रार्दुभाव स्क्लेरोटियम रोल्फसी या बुरशीमुळे होतो. ज्या शेतात पेरणीवेळी जमिनित जास्त ओलावा आणि तापमान जास्त (३० अंश सेल्सियस) असते त्या ठिकाणी रोगाचा प्रार्दुभाव अधिक अढळून येतो. जमिनीवर पूर्वीच्या पिकाचे अर्धवट किंवा न कुजलेले अवशेषामुळे या रोगाचे प्रमाण अधिक असेते. लक्षणे- • पेरणीनंतर ५० दिवसांपर्यंत या रोगाचे जास्त प्रमाण दिसून येते. • झाडे पिवळी पडून वाळून मरतात. • रोगग्रस्त झाड सहजासहजी उपटून येते. • खोडाचा जमिनी लगतचा भाग बारीक होऊन कुजू लागतो. • प्रार्दुभाव झालेल्या भागावर पांढऱ्या रंगाची बुरशी वाढते. व्यवस्थापन- 👉 अधिच्या पिकाचे सर्व अवशेष शेतातून काढून टाकावे. 👉 उन्हाळ्यात जमिनीची खोलं नागरट करावी. 👉 शेतात उत्तम प्रतिचे कंपोस्ट कुजलेले खत वापरावे (५ टन प्रति हेक्टरी)
42
13
इतर लेख