AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकातील गोनोसेफॅलम भुंगा कीड नियंत्रण
गुरु ज्ञानAgroStar
हरभरा पिकातील गोनोसेफॅलम भुंगा कीड नियंत्रण
👉या किडीला भुईकीड किंवा काळी म्हैस असेही म्हणतात. भुंग्याचा रंग काळपट-भुरकट असतो, आणि किडीची मादी जमिनीत अंडी घालते. तिच्या अळी अवस्थेला वायर वर्म म्हणतात. या अळी जमिनीत राहून पेरलेल्या बियांचे अंकुर खातात, ज्यामुळे रोपे व्यवस्थित वाढू शकत नाहीत. प्रौढ भुंगे जमिनीच्या वरच्या थरात राहतात, त्यामुळे ते दिवसा सहज दिसत नाहीत. हे प्रौढ भुंगे जमिनीतील बीजांकुर तसेच उगवलेल्या खोडाच्या सालीचे नुकसान करतात, त्यामुळे रोपे कोलमडतात व त्यांची वाढ खुंटते. 👉या किडीमुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्लूजी घटक असणारे कॉन्स्टा कीटकनाशक वापरणे उपयुक्त आहे. पेरणी करताना 175 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात कीटकनाशक खतात मिसळून जमिनीत द्यावे. या उपायामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होऊन पिकांचे नुकसान टाळले जाते व उत्पादनात वाढ होते. 👉स्रोत:- AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
0
इतर लेख