AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन!
गुरु ज्ञानAgrostar
हरभरा पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन!
🌱 पूर्वीच्या हंगामातील पिकावर घाटे अळीचा उपद्रव झालेला असल्यास अशा शेतात हरभऱ्याचे पिक घेऊ नये. त्या करीता खरीप हंगामात बाजरी ज्वारी अथवा भुईमुग असेल अशा शेतात हरभऱ्याचे पिक घ्यावे. • पेरणीपूर्वी उन्हाळ्यात जमिनीची कुळवाच्या एक दोन पाळ्या घ्याव्यात म्हणजे घाटे अळीचे जमिनीतील कोष पृष्ठभागावर येऊन त्यांचा सूर्याचा प्रखर उष्णतेने व पक्षापासून नाश होतो. • दुबार उगवलेल्या वनस्पती व धसकटे जाळून टाकावीत. • पेरणीसाठी शिफारस केलेल्या वाणांचाच वापर करावा उदा. विजय, दिग्विजय, जॅकी, विराट • पेरणी पूर्वी प्रती किलो बियाणास ४-५ ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा कार्बनडेन्झिम १.५ ते २ ग्रॅम प्रती किलो बियाणे बीजप्रक्रिया करावी.म्हणजे सुरवातीला मर रोगापासून पिकांचे संरक्षण होते. • गहू जवस किंवा मोहरी यांचे कोथंबीर हि आंतरपिके घ्यावीत म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. • हरभऱ्याचे पिक एक महिन्याचे होईपर्यंत निंदणी करून तणविरहित ठेवावे. • पूर्ण वाढ झालेल्या अळ्या शक्य झाल्यास वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. • एकरी ४ कामगंध सापळे बांबूच्या सहायाने अडकवून घाटे अळीचे नियंत्रण करावे. • ५ % निमअर्कचा शिफारशी नुसार फवारणी साठी वापर केल्यास परभक्षी किंवा परोपजीवी किडींचे संवर्धन होऊन घाटे अळीचे प्रभावीपणे नियंत्रण होते. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
0