AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा उत्पादनासाठी सुधारित तत्रंज्ञान
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा उत्पादनासाठी सुधारित तत्रंज्ञान
भारतामध्ये हरभरा पिके हे प्रामुख्याने मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान तसेच बिहार या राज्यांमध्ये घेतले जाते. देशातील एकूण हरभरा क्षेत्रापैकी ९० टक्के आणि एकूण उत्पादनापैकी ९२ टक्के या राज्यांमधून उपलब्ध होते. हवामान:- रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. त्यामुळे थंड हवामान या पिकास मानवते. या पिकामध्ये फुलोरा अवस्थेत पाऊस झाल्यास, फुलातील परागकण एकमेकांना चिटकतात त्यामुळे दाणे भरत नाहीत. परिणामी उत्पादनात घट येते. २४-३० डिग्री सेल्सिअस तपमान या पिकास मानवते.
जमीन :- हरभरा पिकास मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. _x000D_ पूर्वमशागत :- हरभरा पिकासाठी जमीन जास्त भूसभुशित करण्याची आवश्यकता नसते. जमीन नांगरणी करून समतल करून घ्यावी._x000D_ लागवडीची वेळ :- हरभरा पिकाची साधारणतः १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान केल्यास सर्वोत्तम राहते._x000D_ बियाणे :- हरभरा बियाण्याचे प्रमाण बियाण्याचा आकार, पेरणीच्या वेळी व जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून असते. देशी लहान दाणे असणाऱ्या वाणाचे ३० किलोग्रॅम / एकर, मध्यम आकाराचे ३५ किलोग्रॅम प्रति एकर तर मोठ्या आकाराच्या बियाणांची ४० किलोग्रॅम प्रति एकर बियाणे लागतात. _x000D_ बीजप्रक्रिया :- हरभरा पिकामध्ये मर किंवा मूळकूज या रोगांच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी थायरम २ ग्रॅम + कार्बेन्डाझिम १ ग्रॅम या प्रमाणात प्रति किलो बियाण्यास किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम + विटावॅक्स २ ग्रॅम या प्रमाणात प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. _x000D_ खत व्यवस्थापन:- पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी लागवडीवेळी डी.ए.पी @५० किलो + म्यूरेट ऑफ पोटॅश @१५ किलो प्रति एकर पेरणी करतेवेळी द्यावे._x000D_ पाणी व्यवस्थापन :- हरभरा पिकास एक ते दोन पाण्याची आवश्यकता असते. पिकास पाणी जास्त झाल्यास पिकाची शाखीय वाढ अधिक होऊन उत्पादनात घट येते. लागवडीनंतर साधारणतः ४०-४५ दिवसानंतर पहिले पाणी द्यावे. तसेच ६०-६५ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे._x000D_ पीक वाढीच्या अवस्थेत असताना शेंडे खुडून घ्यावेत त्यामुळे पिकामध्ये अधिक फुटवे आणि फुलधारणा होण्यासाठी मदत होते._x000D_ _x000D_ संदर्भ :- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सीलेंस_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
398
1