AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हप्त्याचे पैसे मिळवा वेळच्यावेळी!
कृषी वार्ताAgrostar
हप्त्याचे पैसे मिळवा वेळच्यावेळी!
👉🏻पी.एम.किसान.सम्मान निधी योजनेद्वारे आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता शेतकरी 13 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये 8 कोटी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत, तर 2 कोटींहून अधिक शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. तुम्ही नवीन नियम न पाळल्यास 13व्या हप्त्यात देखील अडचण येऊ शकते. 👉🏻जर तुम्ही या नवीन अपडेट अंतर्गत नवीन नियमांचे पालन केले नाही तर तुम्ही 13 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता.आता शेतकऱ्यांना नोंदणी करताना रेशनकार्डची कॉफीही ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहे. विशेष बाब म्हणजे पीएम किसानच्या वेबसाइटवर रेशन कार्डची कॉफी अपलोड करण्यापूर्वी त्याची पीडीएफ तयार करावी लागेल. 👉🏻यासोबतच ई-केवायसीही अनिवार्य करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही रेशन कार्डची कॉपी अपलोड केल्यानंतर आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच 13व्या हप्त्याचा लाभ घेऊ शकता. 👉🏻आत्तापर्यंत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना स्वतःची नोंदणी करण्यासाठी (PM Kisan) आधार कार्ड, बँक पासबुक, खतौनी आणि घोषणा फॉर्मची हार्ड कॉपी जमा करावी लागत होती. मात्र आता सरकारने ही संपूर्ण प्रक्रिया थांबवली आहे. 👉🏻आता शेतकऱ्यांना हार्ड कॉपीऐवजी फक्त सॉफ्ट कॉपी जमा करावी लागणार आहे. यामुळे सरकारला बनावट लाभार्थी ओळखण्यास मदत होईल. कारण दरवर्षी लाखो अपात्र शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचा खोट्या मार्गाने लाभ घेतात. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
5
इतर लेख