व्यवसाय कल्पनाAgrostar
हटके व्यवसाय..! एक शेणाची गोवरी चक्क 10 रुपयाला !
➡️व्यवसाय म्हणजेच काहीतरी असं मोठे करणे असे नाही. अगदी छोट्यातील छोटी गोष्ट तुमच्या आजूबाजूच्या आणि एकंदरीत समाजात असलेली मागणी आणि त्याची बाजारपेठ एवढ्या गोष्टी लक्षात घेऊन छोट्यात छोट्या पद्धतीने गरज लक्षात घेऊन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणे फार गरजेचे असते.
➡️आपल्याला बर्याच प्रकारच्या देशी गाय पासून मिळणाऱ्या शेनापासून तसेच गोमूत्र अजून बरेच काही वस्तू तयार करता येऊन त्या विकता येतात. परंतु यासंबंधीचे मार्केट आणि त्यासंबंधीची माहिती असणे फार गरजेचे असते. आता शेनापासून बनवण्यात येणाऱ्या गोवऱ्या सगळ्यांना माहिती आहेत. या गोवऱ्यांची विक्री तुम्ही विविध प्रकारचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरून सुद्धा करू शकतात.
➡️अशाच या शेणापासून बनणाऱ्या गोवऱ्या निर्मितीचे काम सोलापुरातील जय संतोषी गोशाळेमध्ये मोठ्याप्रमाणात केले जात आहे. त्यामागे कारणही तसेच असून या गोशाळे ला जर्मनी आणि मलेशियातून तब्बल 1 लाख गोवऱ्यांची ऑर्डर मिळाली आहे. या गोशाळांनीही ऑर्डर जवळ आता पूर्ण केली असून आता मलेशिया आणि जर्मनीला या गोवऱ्या निर्यात करण्याचे काम सुरू आहे.
➡️या गोशाळेत शेणापासून गोवऱ्या निर्मिती करत असताना त्यांच्या विशेष आकर्षक पॅकिंग कडे खूप मोठ्या प्रमाणात लक्ष दिले जाते. निर्यात होणाऱ्या गोवऱ्या विशिष्ट पद्धतीने पॅकिंग केल्या जातात. नंतर त्यांना पूर्णपणे व्यवस्थित सुकवलेल्या जातात. यामध्ये थोडीसुद्धा ओल शिल्लक नसल्यामुळे त्या वर्षभर चांगल्या पद्धतीने टिकतात. ह्या गोवऱ्या सुकल्यानंतर त्यांचे एका पॅकिंग मध्ये दहा गोवऱ्या अशा पद्धतीने पॅकिंग केले जाते त्यानंतर त्यांना बॉक्स करून स्थानिक बाजारात त्या 40 रुपये पंचवीस नग याप्रमाणे विक्री केल्या जातात.
➡️विदेशामध्ये दहा रुपयांना एक याप्रमाणे गोवऱ्यांची किंमत मिळत आहे. याशिवाय गोशाळेमध्ये गोमूत्र अर्क, पेन किलर बाम, दंतमंजन, जीवामृत इत्यादी उत्पादने तयार केली जातात.
➡️संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.