गमतीदारलोकमत
५० हजारांपेक्षाही कमी असणारा पहिला लॅपटॉप बाजारात येणार!
👉कंपनीचा हा पहिलाच लॅपटॉप असणार. शाओमीच्या मी नोटबूकला याची टक्कर मिळण्याची शक्यता 👉स्मार्टफोन मार्केटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर, Realme ही कंपनी लॅपटॉप सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे. कंपनी आपल्या फोरमवर युझर्सना लॅपटॉपविषयी अनेक प्रश्न विचारत आहे. तसंच येत्या दोन तीन महिन्यांमध्ये लॅपटॉप विकत घेण्याचा विचार सुरू आहे का अशी विचारणाही त्यांना केली जात आहे. 👉कंपनीच्या या गोष्टींवरून असं दिसतं की Realme आपला पहिला लॅपटॉप २०२१ च्या तिसर्‍या तिमाहीत लॉन्च करण्याची तयारी करत आहे. 👉या प्रश्नांसोबतच कंपनीनं किंमतीबाबतही काही प्रश्न विचारले आहे. जर कंपनीनं लॅपटॉप लाँच केला तर किती किंमतीत ते विकत घेण्यासाठी तयार आहेत. 👉तसंच यासाठी प्राईज रेंज ३०००० ते ५०००० इतकी ठरवण्यात आली आहे. यावरून कंपनी एन्ट्री लेव्हलचा लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. रिअलमीचा लॅपटॉप लाँच होण्याची गोष्ट खरी असेल तर तो थेट शाओमीच्या मी नोटबूक १४ ला टक्कर देईल. याची किंमत ४१९९९ इतकी आहे. रिअलमीदेखील याच रेंजमध्ये लॅपटॉप आणण्याच्या तयारीत दिसत आहे. रिअलमीचा हा पहिलाच लॅपटॉप असणार आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
19
3
इतर लेख