AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्वीट कॉर्नची लागवड करून मिळवा दुप्पट नफा!
गुरु ज्ञानAgrostar
स्वीट कॉर्नची लागवड करून मिळवा दुप्पट नफा!
🌽पावसाळ्यात मसालेदार स्वीट कॉर्नची चव कोणाला आवडत नाही. चांगल्या चवीबरोबर ते शेतकऱ्यांच्या चांगल्या उत्पन्नाचे साधनही बनू शकते. त्यामुळे जे शेतकरी खरीप हंगामात मक्याचे सामान्य पीक पेरतात, त्यांनी जर स्वीट कॉर्नच्या लागवडीचा निर्णय घेतला तर ते आणखी चांगले उत्पन्न मिळवू शकतात. 🌽वास्तविक, स्वीट कॉर्न ही मक्याची एकमेव गोड जात आहे, मक्याचे पीक पक्व होण्यापूर्वी त्याची काढणी दुधाळ अवस्थेत केली जाते. स्वीट कॉर्न भारताबरोबरच इतर देशांमध्येही स्वीट कॉर्न ला पसंदी मिळते. 🌽स्वीट कॉर्नची शेती कशी करावी : 👉🏻मक्याच्या लागवडीप्रमाणेच स्वीट कॉर्नची लागवड केली जाते. स्वीट कॉर्नच्या लागवडीमध्ये मका पीक पक्व होण्याआधीच तोडले जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना अल्पावधीत चांगले उत्पन्न मिळते. 👉🏻त्याची लागवड करताना मक्याचे सुधारित वाण निवडा. 👉🏻कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या वाणासोबत कीटकांना प्रतिरोधक वाण निवडावे . 👉🏻शेत तयार करताना पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी जेणेकरून पिकात पाणी साचणार नाही. 👉🏻स्वीट कॉर्न संपूर्ण भारतात घेतले जात असले तरी उत्तर प्रदेशात त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. 👉🏻उत्तर भारतात खरीप हंगामात म्हणजे जून ते जुलै दरम्यान पेरणी केली जाते. 👉🏻स्वीट कॉर्नची लागवड रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात करता येते. 🌽संदर्भ:- AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
4