ऑटोमोबाईलABP माझा.
स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, जाणून घ्या खासीयत!
➡️भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या स्कूटरचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात सादर करत आहेत.
➡️अशातच भारतीय बाजारात एक दमदार इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झाली आहे. आग्रा येथील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक NIJ ऑटोमोटिव्हने आपली Accelero+ इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत 53,000 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत बॅटरी पॅकनुसार 98,000 रुपयांपर्यंत जाते. यात वाल्व रेग्युलेटेड लीड-ऍसिड (VRLA) आणि लिथियम फेरो फॉस्फेट (LFP) बॅटरी पॅकचा पर्याय मिळतो. कंपनीने याचे अनेक व्हेरिएंट सादर केले आहेत.
➡️रेंज आणि चार्जिंग :-
NIJ Accelero+ मध्ये तीन राइडिंग मोड मिळतात. यातच इको मोडमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्जिंगवर 190 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. याच्या LFP बॅटरी पॅकमध्ये 1.5kW (48V), 1.5kW (60W) आणि ड्युअल बॅटरी 3kW (48V) चा पर्याय मिळतो. लीड-अॅसिड बॅटरी पॅक 3A पॉवर सॉकेटसह 6 ते 8 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज केला जाऊ शकतो. तसेच लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरी पॅक 6A सॉकेटमधून 3 ते 4 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होऊ शकतो.
➡️फीचर्स :-
NIJ Accelero+ मध्ये कंपनीने इम्पीरियल रेड, ब्लॅक ब्युटी, पर्ल व्हाइट आणि ग्रे टच कलर पर्याय दिले आहेत. या स्कूटरला ड्युअल एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि बूमरँग स्टाइल एलईडी इंडिकेटर देण्यात आले आहे. यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर, यूएसबी चार्जिंग, रिव्हर्स असिस्ट आणि चार्जिंग पोर्ट सारखे फीचर्स ग्राहकांना मिळणार आहेत. भारतीय बाजारात याची स्पर्धा Ather 450X, Bajaj Chetak Electric, TVS iQube, PURE EV ETrance Neo, Ampere Zeal Hreo Electric Photon आणि Pure EV EPluto 7G सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी असेल.
➡️संदर्भ :-ABP माझा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.