AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 'स्मार्टकेम'ची अ‍ॅग्रोस्टार सोबत भागीदारी!
कृषि वार्ताअ‍ॅग्रोवन
'स्मार्टकेम'ची अ‍ॅग्रोस्टार सोबत भागीदारी!
➡️ खत उद्योगात आघाडीची कंपनी असलेल्या स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लि.ने अ‍ॅग्रोस्टार या आघाडीच्या कृषी निविष्ठा ई-कॉमर्स व्यासपीठासोबत भागीदारी करत असल्याचे जाहीर केले. स्मार्टकम हि दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) या खाते आणि औद्योगिक रसायने उद्योगातील कंपनीच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ➡️ डिजिटलायझेशनमुळे ग्राहकांना सेवा आणि उत्पादने वितरित करण्याच्या पद्धतीत वेगाने बदल होत आहेत. या भागीदारीमुळे मूल्यवर्धित, अनोखी खते थेट शेतकऱ्यांपर्यंत घरपोच पोहचवणे शक्य होणार आहे. सध्या महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना खते घरपोच देण्याची सेवा सुरु असून भविष्यात अन्य भागांमध्येही हि सेवा सुरु करण्याची योजना आहे. 'डीएफपीसीएल'च्या पीक पोषकता व्यवसायाचे अध्यक्ष महेश गिरधर म्हणाले, ''कोविड -१९ चे संकट आणि मोबाईल डेटा स्वस्तात उपलब्ध झाल्याने अगदी ग्रामीण भागातही ई-कॉमर्स व्यासपीठाचा वापर वाढला आहे. हा ट्रेंड हळूहळू कृषी क्षेत्रातही वाढत असून, शेतकऱ्यांसाठी पारंपरिक सेवांपलीकडे जात उच्च दर्जाची महाधन उत्पादने घरपोच करण्यात येणार आहेत. त्यासाठी अ‍ॅग्रोस्टार या स्टार्टअप सोबत भागीदारी करत आहोत.'' ➡️ या वेळी बोलताना अ‍ॅग्रोस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक शार्दुल शेठ म्हणाले, "कृषी उत्पादन आणि दर्जा यामध्ये वाढ करायची असते तर उत्तम प्रतीची पोषणतत्त्वे आवश्यक असतात. त्यांचा वापर योग्य वेळीच करणे आवश्यक असते. स्मार्टकेम टेक्नॉलॉजीजजसोबत भागीदारीतून हे तंत्रज्ञान विविध राज्यांमध्ये अधिक व्यापक प्रमाणावर पोहोचविण्यात येईल.'' संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
10
4