कृषि वार्ताAgrostar
स्टिकी ट्रॅप लावण्याचे फायदे!
✅ स्टिकी ट्रॅप म्हणजे एक पातळ चिटकवणारी शीट असते. ही कोणतेही रसायन न वापरता पिकांचे संरक्षण करते आणि रासायनिक उपायांच्या तुलनेत स्वस्त देखील असते. स्टिकी ट्रॅपच्या शीटवर कीटक चिकटून बसतात, त्यामुळे ते पिकांना हानी पोहोचवू शकत नाहीत. स्टिकी ट्रॅप विविध रंगांच्या शीट्समध्ये उपलब्ध असतात, ज्या पिकांना हानी पोहोचवणाऱ्या कीटकांना आकर्षित करण्यासाठी शेतात लावल्या जातात.
✅ यामुळे पिकांवरील हानिकारक कीटकांपासून संरक्षण मिळते आणि शेतात कोणत्या प्रकारचे कीटक प्रादुर्भाव करीत आहेत याचा अभ्यासही होतो.
- पिवळा स्टिकी ट्रॅप: पांढरी माशी, एफिड आणि लीफ माइनर यांसारख्या कीटकांसाठी उपयोगी आहे. हा प्रामुख्याने भाजीपाला पिकांमध्ये वापरला जातो.
- निळा स्टिकी ट्रॅप: निळ्या रंगाचा ट्रॅप थ्रिप्स कीटकांसाठी वापरला जातो. हा कीटक भात, फुले आणि भाजीपाला पिकांना नुकसान पोहोचवतो.
👉🏻संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.