योजना व अनुदानAgrostar
सोलर पॅनल लावण्यासाठी सबसिडी!
➡️दिवसेंदिवस विजेच्या वाढत्या मागणीमुळे लोक वीज बिल वाचवण्यासाठी घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवण्याचा विचार करतात. परंतु सध्या देशात सोलर सिस्टीम पॅनल बसवण्याचा खर्च खूप जास्त आहे. पण तुम्ही सबसिडीसाठी अर्ज केल्यास खर्चाचा हा भार थोडा कमी होऊ शकतो.
➡️नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयने रूफटॉप सोलरसाठी डिस्कॉम हे राष्ट्रीय पोर्टल आणले आहे. येथे तुम्हाला रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्याबाबत सर्व माहिती मिळेल. येथे तुम्ही छतावरील सौर पॅनेलसाठी अर्ज करू शकता. पोर्टलवर तुम्हाला किंमत, गुणवत्ता आणि देखभाल यासंबंधी सर्व माहिती मिळेल. त्यासाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.
- प्रथम SANDES अॅप डाउनलोड करा आणि राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करा. तुमची स्थानिक वितरण कंपनी किंवा वीज विभाग निवडा. तुमचा वीज कनेक्शन क्रमांक किंवा ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा. तुमचा ईमेल आणि मोबाईल नंबर टाका. नोंदणीसाठी ओटीपी येईल. त्यानंतर पडताळणी होईल.
- यशस्वी नोंदणीनंतर तुम्ही घरामध्ये रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यासाठी अर्ज करू शकता. येथे तुम्हाला वीज बिलावरील नाव, पत्ता, छताचे क्षेत्र इत्यादींची माहिती द्यावी लागेल. घराच्या गरजेनुसार, तुम्हाला किती क्षमतेचे पॅनल्स बसवायचे आहेत हे सांगावे लागेल. नवीन वीजबिल द्यावे लागेल. त्यानंतर सबमिट करा.
- तुमचा अर्ज नियमांनुसार डिस्कॉमकडे पाठवला जाईल. तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीबद्दल मेलवर माहिती मिळेल. डिस्कॉमकडून परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या छतावर सोलर पॅनेल बसवू शकता. रूफटॉप सोलर सिस्टीम बसवल्यानंतर अर्जदाराला प्रकल्प पूर्णत्वाचा अहवाल सादर करावा लागेल.
- डिस्कॉम अधिकारी नेट-मीटर स्थापित करतील आणि तुमचे तंत्रज्ञान आणि पॅरामीटर्स तपासतील. नेट-मीटर योग्य असल्याचे आढळल्यानंतर डिस्कॉम ऑनलाइन कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करेल.
- अर्जदाराची बँक माहिती घेतली जाईल. अर्जदाराला रद्द केलेला चेकही द्यावा लागेल. निधीचे व्यवस्थापन करणारी केंद्र सरकारची एजन्सी अनुदान थेट बँक खात्यात हस्तांतरित करते.
➡️संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.