AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोलर पंप बसवण्यासाठी काय कारवे?
योजना व अनुदानAgrostar
सोलर पंप बसवण्यासाठी काय कारवे?
➡️पीएम कुसुम योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारही शेतकऱ्यांना अनुदान देते. या योजनेंतर्गत शेतकरी ओसाड जमिनीवरही सौरपंप बसवू शकतात. सौरऊर्जेद्वारेही वीजनिर्मिती केली जाणार असून, त्याद्वारे सिंचनही करता येणार आहे. विशेष म्हणजे पीएम कुसुम योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे किमान 4 ते 5 एकर जमीन असावी. एवढ्या जमिनीवर शेतकरी एका वर्षात 15 लाख युनिटपर्यंत वीज निर्मिती करू शकतात. अशा परिस्थितीत सिंचनानंतर वीज विकूनही शेतकरी कमाई करू शकतात. केंद्र सरकार पीएम कुसुम योजनेच्या एकूण खर्चावर 45 टक्के सबसिडी देते. ➡️पीएम कुसुम योजनेसाठी शेतकरी घरी बसून अर्ज करू शकतात. 👉यासाठी त्यांना प्रथम ऊर्जा मंत्रालयाच्या www.mnre.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही लॉगिन करताच, Apply Online चा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. 👉यानंतर शेतकऱ्यांना फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरावी लागणार आहे. यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. 👉तो जमा होताच शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर युजर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. 👉त्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने तुम्ही कुसुम योजनेत तुमची माहिती अपडेट करू शकता. 👉त्यानंतर ते सबमिट करताच पंतप्रधान कुसुम योजनेसाठी अर्जाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ➡️या कागदपत्रांची आवश्यकता असेल. 👉आधार कार्ड 👉बँक खाते क्रमांक 👉जमिनीची कागदपत्रे 👉शिधापत्रिका 👉आधारकार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक 👉पासपोर्ट आकाराचा फोटो ➡️ संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
0
इतर लेख