AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन सुकवण्यासाठी ड्रायर!
कृषी यांत्रिकीकरणAgrostar
सोयाबीन सुकवण्यासाठी ड्रायर!
➡️ओलावा असल्यामुळे सोयाबीन बाजारामध्ये कमी भावाने विकले जाते. ही समस्या प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना येते.परंतु आता या पार्श्‍वभूमीवर शेतकरी बंधुंनी ओल्या सोयाबीनची काळजी करण्याची गरज नसून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एक यंत्र यासाठी विकसित केले आहे. ➡️डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ओले सोयाबीन सुकवण्यासाठी एक विशेष यंत्र तयार केले असून या यंत्राच्या साहाय्याने आता सोयाबीन लवकरत लवकर वाळवता येणार आहे. ➡️कृषी विद्यापीठाने विकसित केलेले हे ड्रायर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी लाभदायक सिद्ध होणार आहे. ड्रायरमध्ये लाकुड जाळून गरम हवा तयार केली जाते आणि या हवेच्या साह्याने सोयाबीन वाळवला जातो. विशेष म्हणजे या ड्रायरमध्ये तापमान कमी-जास्त करण्याची सोय देखील उपलब्ध आहे. कृषी विद्यापीठाने सोयाबीन वाळवण्यासाठी विकसित केलेल्या या ड्रायरची क्षमता 20 क्विंटलपर्यंत आहे. निश्चितच या यंत्राच्या साह्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच एक मोठ टेन्शन कमी होणार आहे. या यंत्राचा वापर केल्यास भविष्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आपला सोयाबीन आद्रतेमुळे किंवा ओलाव्यामुळे कमी भावात विकावा लागणार नाही. ➡️संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
46
3
इतर लेख