AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पेरणी पूर्वीचे नियोजन!
गुरु ज्ञानAgrostar
सोयाबीन पेरणी पूर्वीचे नियोजन!
🍃शेताची मशागत खोल आणि चांगली करावी, 1 वेळा नांगरणी करून रान तापवून घ्यावे. 🍃मागील हंगामातील पिकांचे अवशेष, धसकटे काढून टाकावी, मागील हंगामातील कोणतेच अवशेष राहणार नाही याची दक्षता घ्यावी. 🍃शेत तापल्यानंतर 1 आडवी आणि 1 उभी अशा दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. 🍃शेतामध्ये एकरी 10 ते 12 गाड्या चांगले कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवाच्या अगोदर मातीत मिसळून घ्यावे आणि जमिन पेरणीसाठी तयार करून घ्यावी. 🍃जमीन मध्यम स्वरूपाची तसेच भुसभुशीत व पाण्याच्या निचरा होणारी असावी, चोपण, क्षारपड जमिन निवडू नये. 🍃पेरणी करताना पावसाचा अंदाज घेवुन पेरणी करावी, सोयाबीन पेरणी 75 ते 100 मी. मी. पाऊस झाल्यानंतर करावी. 🍃धूळ पेरणी टाळावी. पेरणी पूर्वी रासायनिक खताची मात्रा द्यावी. 🍃सोयाबीन बियाणे बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. 🍃संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
50
11
इतर लेख