AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकासाठी पूर्व मशागत व खतमात्रा नियोजन!
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
सोयाबीन पिकासाठी पूर्व मशागत व खतमात्रा नियोजन!
जमीन खोल नांगरुन उभ्या आडव्या कुळवाच्या दोन पाळ्या देऊन चांगली भुसभुशीत करावी. त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत किंव कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. त्याचबरोबर लागवड करताना सोयाबीन पिकाची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे. त्यासाठी जमीन वाफशावर असताना ४५ x ५ सें.मी. किंवा ३० x १० सें.मी. अंतरावर करावी. पेरणी करताना बियाणे ३-५ सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तसेच पिकाच्या चांगल्या वाढीसाठी पेरणी करताना १८:४६:०० @५० किलो प्रति एकरी देऊन पूर्ण उगवण झाल्यावर गरजेनुसार शक्य असल्यास पाणी द्यावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
176
3