AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकामधील 'गर्डल बीटल'ची लक्षणे आणि उपाय!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकामधील 'गर्डल बीटल'ची लक्षणे आणि उपाय!
 लक्षणे:- • फांद्या व खोडांवर दोन गोलाकार खाचा दिसतात. • पाने मरगळतात आणि कालांतराने वळतात. • कोवळ्या रोपांची मर होते. • बीटलचे डोके आणि छाती पिवळट लाल रंगाची तर पंख तपकिरी असतात. • या किडीची अळी अवस्था पांढऱ्या पंगाची असते.  उपाय:- या किडीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस ५०% ईसी @३००-४०० मिली किंवा थायोमेथॉक्झाम १२.६% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी घटक असणारे कीटकनाशक @५० मिली प्रति एकर फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
135
43