गुरु ज्ञानAgroStar
सोयाबीन पिकातील शेंगेवरील करपा रोगाचे नियोजन
🌱सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाच्या शेंगांवर करपा रोगाची समस्या दिसून येत आहे. यामध्ये पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात व नंतर त्यावर काळे सूक्ष्म बुरशीपुंज दिसून येतात. शेंगांचा आकार लहान व पोचट राहतो आणि त्याचा बीजनिर्मितीवर विपरीत परिणाम होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी टेबुकोनाज़ोल 10 % + सल्फर 65 % घटक असणारे टेबुल @ 500 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावे.
🌱संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.