अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील मोझॅक व्हायरसबद्दल जाणून घ्या!
हा विषाणूजन्य रोग बियाण्याद्वारे आणि मावा किडीमार्फत प्रसारित होतो. सुरुवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकटनेिस्तेज, पिवळे ठिपके/चट्टे दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या/ चट्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा -हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस-करपट रंगाचे ठिपके दिसतात. रोगग्रस्त झाडांवरील पाने अरुंद व वेडीवाकडी होऊन त्यांचा आकार लहान होतो. रोगग्रस्त झाडांवरील शेंगाची संख्या कमी होऊन त्यात लहान आकाराचे दाने भरतात किंवा संपूर्ण शेंगा दानेविरहीत व पोचट उपजतात परिणामी उत्पादनात लक्षणीय घट येते. याचा प्रसार रोखण्यासाठी प्रथम शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करून मावा किडीचे नियंत्रण करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
87
28
इतर लेख