AgroStar
 सोयाबीन पिकातील तांबेरा रोग नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील तांबेरा रोग नियंत्रण !
🌱सततच्या पडणाऱ्या पावसामुळे व दमट वातावरणामुळे सोयाबीन पिकात तांबेरा रोग आढळून येतो. याची लक्षणे म्हणजे तपकिरी रंगाचे ठिपके पिकांच्या पानांवर दिसून येतात. ते ठिपके वाढत जातात आणि संपूर्ण पान करपलेले दिसते. सुरुवातीला पानांवर आणि पुढे जाऊन शेंगांवर देखील या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. यामुळे पिकाची अन्ननिर्मिती प्रक्रिया मंदावून पिकाच्या उत्पादनावरती परिणाम होतो. नियंत्रणासाठी हेक्साकोनाझोल 5 % SC घटक असणारे हेक्सा या बुरशीनाशकाची @1 मिली प्रति लिटर प्रमाणे योग्य वेळेत फवारणी करावी. 🌱 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
6
इतर लेख