AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकातील चक्री भुंगा आणि खोड माशी व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील चक्री भुंगा आणि खोड माशी व्यवस्थापन!
सध्या सोयाबीन पिकामध्ये चक्री भुंगा आणि खोड माशीच्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ह्या किडींची अळी पाने तसेच खोड पोखरून खोडाच्या आतील सगळा भाग खाऊन टाकते त्यामुळे खोडामधून अन्नद्रव्ये वहन क्रिया बंद होऊन कालांतराने झाड वळून जाते. यामुळे पिकाचे सुरुवातीच्या काळापासून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीपासून जमिनीची योग्य मशागत करून सोयाबीन पेरणी मान्सून पाऊस झाल्यानंतरच करावी. तसेच पिकात झाडांची योग्य संख्या राखून अतिरिक्त नत्रयुक्त खतांचा वापर करणे टाळावा. किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावी आणि किडीच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असणारे अलिका @ 80 मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
103
59