AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकातील उंट अळीचे नियंत्रण!
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील उंट अळीचे नियंत्रण!
ही अळी नावाप्रमाणेच हिरवी असून पोटावर कमी असलेल्या पायांमुळे ती उंटाप्रमाणे पाठीस विशिष्ट वाक देऊन किंवा कुबड काढून चालते. मादीचा पतंग एका ठिकाणी केवळ एकच अंडे घालतो. त्या अंड्यामधून निघालेली अळी प्रथम पानांमधील हरित द्रव्य खाते. नंतर मोठी झालेली अळी पानांचा पूर्ण भाग खातात त्यामुळे पानांच्या शिराच शिल्लक राहतात व झाडांची वाढ खुंटते. नियंत्रण:- ४ लहान अळ्या प्रति मीटर ओळीत आढल्यास आर्थिक नुकसानीची पातळी समजावी. त्यामुळे याचे वेलीचे नियंत्रण करावे. नियंत्रणासाठी क्लोरँट्रेनिलिप्रोल १८.५% ईसी @५ मिलि किंवा फ्ल्यूबेंडामाईड ३९.३५% @६ ग्रॅम किंवा थायमिथोक्झाम १२.६ + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५ टक्के @५ मिलि प्रती पंप लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
93
44