गुरु ज्ञानAgroStar
सोयाबीन पिकाची काढणी व साठवणूक!
👉सोयाबीन उत्पादनात घट येण्यामागे काढणी आणि काढणीपश्चात अयोग्य पद्धतीने हाताळणी हे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे वेळेवर काढणी, मळणी आणि योग्य साठवण करण्याची गरज आहे. सोयाबीनची योग्य काढणी, मळणी व साठवण केल्याने बियाण्याची प्रत उत्तम राहते व उगवणक्षमता वाढते. पिकाची काढणी, मळणी आणि साठवणूक पुढीलप्रमाणे करावी.
👉काढणी
1.सोयाबीन पीक पेरणीनंतर साधारणत 95 ते 110 दिवसांत काढणीसाठी तयार होते. योग्य वेळी काढणी न केल्यास शेंगा तडकून उत्पादनात घट येते.
2.पीक परिपक्व झाल्यानंतर 85 ते 90 टक्के पाने देठासहित गळून पडतात. शेंगांचा रंग पिवळा ते काळसर होऊ लागतो. अशावेळी पिकाची कापणी सुरु करणे आवश्यक आहे.
3.पिकाची कापणी धारदार विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत करावी. कापणी केलेल्या पिकाचे लगेच ढीग लावू नये. कापणी केल्यानंतर उन्हात न वाळवता लगेच ढीग लावल्यास त्यास बुरशी लागून धान्याची प्रत खालावते.
4.त्यामुळे कापलेले पीक शेतातच उन्हात वाळू द्यावे. मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केलेली असल्यास वेळ व पैशांची बचत होण्याच्या दृष्टीने कापणी व मळणी ही यंत्राद्वारे (कम्बाईन हार्वेस्टर) करणे योग्य ठरते.
👉 मळणी
काठी किंवा मोगरीने बडवून किंवा मळणी यंत्राद्वारे मळणी करता येते.
👉साठवण
1.मळणीनंतर बियाणांची योग्य ठिकाणी साठवण करणे गरजेचे आहे. साठवण करण्यापूर्वी बियाणे 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगले वाळवावे. साठवण करतेवेळी बियाण्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12 टक्के पेक्षा जास्त असू नये.
2.बियाणे हाताळताना ते जास्त उंचीवरून आपटले जाणार नाही याची काळजी घ्यावी. स्वच्छ केलेले बियाणे कोरड़या जागेत ओल विरहित किंवा नवीन पोत्यात साठवून ठेवावे. साठवणुकीची जागा कोरडी व ओलावा प्रतिबंधक असावी.
3.पोत्यांची थप्पी जमिनीपासून 10-15 सें.मी. उंचीवर लाकडी फळ्यांवर लावावी. प्रत्येक पोते 80 किलोपर्यंत भरलेले असावे.
4.पोती एकावर एक रचताना 4 पेक्षा जास्त पोते एकावर एक ठेवू नयेत. अन्यथा, सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणे फुटून त्याची गुणवत्ता खालावते तसेच पेरणीसाठी बियाणाचा वापर केल्यास उगवणक्षमता कमी होते.
5.पोत्यांची रचना उभीआडव्या पद्धतीने करावी, म्हणजे हवा खेळती राहून बियाण्याची गुणवत्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होईल.
🌱संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.