AgroStar
सोयाबीन कीडरोग प्रतिबंध व उत्पादन वाढीसाठी करा बीज प्रक्रिया !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन कीडरोग प्रतिबंध व उत्पादन वाढीसाठी करा बीज प्रक्रिया !
🌱सोयाबीनची उगवणशक्ती साठवणुकी मध्ये कमी होत जाते. त्यामुळे साठवणूक केलेले बियाणे उगवणशक्ती तपासल्याशिवाय पेरणीसाठी वापरू नये. सोयाबीनची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. सोयाबीन पेरणी ७५ ते १०० मी. मी. पाऊस झाल्यानंतर करावी तसेच बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. 🌱बीज प्रक्रियाचे फायदे : १. जमिनीतुन व बियाणाद्वारे पसरणारया रोगांचा आणि रोप अवस्तेत येणाऱ्या खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळता येतो. बियाण्याची उगवण क्षमता वाढते. २. रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात. ३. कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मक उपाय करून पेरणी करता येते. ४. पिकाच्या उत्पादनात वाढ होते. 🌱बीज प्रक्रिया करण्याचा क्रम : १. सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशक कार्बोक्सिन 37.5%+ थायरम 37.5% घटक असणारे विटाव्याक्स पॉवर ३ ग्रॅम प्रति किलो बिजप्रक्रिया करावी. २. नंतर रासायनिक कीटकनाशक थायमीथॉक्ज़ाम ३० % फ.एस. घटक असणारे क्रुझर प्लस ५-१० मिली प्रति किलो बिजप्रक्रिया करावी. ३. त्यानंतर १५ मिनिटांनी नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन गटाचे रायझोबियम १ लिटर पाणीमध्ये १२५ ग्रॅम गुळ घेऊन रायझोबियम २५ ग्रॅम प्रति किलो बिजप्रक्रिया करावी. ४. सर्वात शेवटी स्फुरद विरघळविणारे जीवाणू २५ ग्रॅम प्रति किलो बीजप्रक्रिया करून बियाणे अर्धा ते एक तास सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
2
इतर लेख