गुरु ज्ञानतुषार भट
सोयाबीन काढणी व साठवणूक!
👉🏻 सोयाबीनची वेळेवर काढणी, मळणी करून योग्य पद्धतीने साठवण करणे आवश्यक आहे. सोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर योग्यरीत्या केल्यास बियाण्याची प्रत चांगली राहण्यास मदत होते तसेच उगवणक्षमता वाढवण्यास मदत होते.
👉🏻काढणी :
👉🏻सोयाबीन पीक पेरणीनंतर साधारणत 95 ते 110 दिवसांत काढणीसाठी तयार होते. योग्य वेळी काढणी न केल्यास शेंगा तडकून उत्पादनात 95 ते 20 टक्के घट येते. पीक परिपक्व झाल्यानंतर 85 ते 90 टक्के पाने देठासहित गळून पडतात. शेंगांचा रंग पिवळा ते काळसर होऊ लागतो.
👉🏻अशावेळी पिकाची कापणी सुरु करणे आवश्यक आहे. पिकाची कापणी धारदार विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत करावी. कापणी केलेल्या पिकाचे लगेच ढीग लावू नये. कापणी केल्यानंतर उन्हात न वळवता लगेच ढीग लावल्यास त्यास बुरशी लागून धान्याची प्रत खालावते. त्यामुळे कापलेले पीक शेतातच उन्हात वाळू द्यावे.
👉🏻 मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केलेली असल्यास वेळ व पैशांची बचत होण्याच्या दृष्टीने कापणी व मळणी ही यंत्राद्वारे (कम्बाईन हार्वेस्टर) करणे योग्य ठरते.
👉🏻मळणी : काठी किंवा मोगरीने बडवून किंवा मळणी यंत्राद्वारे मळणी करता येते.
👉🏻साठवण :
👉🏻मळणीनंतर बियाणांची योग्य ठिकाणी साठवण करणे गरजेचे आहे. साठवण करण्यापूर्वी बियाणे 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगले वाळवावे.
👉🏻साठवण करतेवेळी बियाण्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12 टक्के पेक्षा जास्त असू नये. बियाणे हाताळताना ते जास्त उंचीवरून आपटले जाणार नाही याची काळजी घ्यावी.
👉🏻स्वच्छ केलेले बियाणे कोरड़या जागेत ओल विरहित किंवा नवीन पोत्यात साठवून ठेवावे. साठवणुकीची जागा कोरडी व ओलावा प्रतिबंधक असावी.
👉🏻पोत्यांची थप्पी जमिनीपासून 10-15 सें.मी. उंचीवर लाकडी फळ्यांवर लावावी. प्रत्येक पोते 80 किलोपर्यंत भरलेले असावे. पोती एकावर एक रचताना 4 पेक्षा जास्त पोते एकावर एक ठेवू नयेत. अन्यथा, सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणे फुटून त्याची उगवणक्षमता कमी होते.
👉🏻पोत्यांची रचना उभीआडव्या पद्धतीने करावी, म्हणजे हवा खेळती राहून बियाण्याची गुणवत्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होईल.
👉🏻संदर्भ:- तुषार भट
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.