AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन काढणी काळजीपूर्वक करणे आवश्यक
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन काढणी काळजीपूर्वक करणे आवश्यक
सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरून ते पक्व झाल्यापासून, पिकाची कापणी करेपर्यंत असणारी हवामानाची स्तिथी ही उत्पादित होणाऱ्या बियाण्याच्या उगवणशक्ती व गुणवत्तेच्या दृष्टीने फार महत्वाची असते. पिकाच्या या अवस्थेत शेंगा पक्व होत असताना, बियातील आर्द्रता झपाट्याने कमी होत असते. या काळात सतत व दीर्घकाळ पडणारा पाऊस अत्यंत नुकसानकारक असतो. काढणीच्या वेळी पावसाने होणारे असे नुकसान टाळण्यासाठी पीक जेव्हा पक्व अवस्थेत असते व बियांतील आर्द्रतेचे प्रमाण साधारणतः १४ ते १६ टक्क्यांदरम्यान असेल तेव्हा काढणी करणे आवश्यक असते.
पिकाची कापणी करताना शेतीमध्ये तण असल्यास त्याची पिकाबरोबर कापणी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. कापणी करण्यापूर्वी शेतीतील रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. त्याचबरोबर शेंगा भरतेवेळी डायथेन-एम-४५ या बुरशीनाशकाची @२५-३५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. यामुळे बियाण्यांवरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होऊन उगवणशक्ती सुधारते. पिकाची कापणी धारदार विळ्याच्या साहाय्याने जमिनीलगत करावी. जेणेकरून शेतीमध्ये शेंगा राहणार नाहीत. कापणी करताना झाडे उपटून येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. अन्यथा बियाण्यात मातीचे खडे मिसळू शकतात. कापणी केलेल्या पिकाचे लगेच ढीग लावू नयेत व कापलेले पीक शेतीमध्ये ऊन्हात वाळू द्यावे. ढीग लावल्यास बियाण्याच्या प्रतीवर व उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केलेली असल्यास वेळ व पैशाची बचत होण्याच्या दृष्टीने कापणी व मळणी या यंत्राद्वारे (कम्बायन हार्वेस्टर) करणे योग्य ठरते, अशा वेळी कापणीचे पाते जमिनीच्यावर ८ ते १० से.मी. राहतील व यंत्राचा वेग मध्यम राहील, याची काळजी घ्यावी, अशाप्रकारे सोयाबीन पिकाची योग्य काळजी घेऊन योग्य कापणी करावी. _x000D_ _x000D_ संदर्भ- अॅग्रोस्टार अॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सेलन्स जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
427
3