सोयाबीन, कपाशीवरच यंदाही राहील भर !
कृषी वार्ताAgrostar
सोयाबीन, कपाशीवरच यंदाही राहील भर !
➡️जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आगामी खरीप हंगामात सोयाबीन, कापूस या पिकांवर जोर राहणार असल्याने कृषी खात्याने तसे नियोजन केले आहे. उत्पादन खर्च वाढलेला असतानाच दोन्ही पिकांना समाधानकारक दर मिळत असल्याने पसंती वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दोन पिकांमध्येच क्षेत्राबाबत स्पर्धा राहून क्षेत्र कमी-अधिक होत खरीप हंगाम साधला जाऊ शकतो, असा अंदाज आहे. ➡️गेले वर्षभर कापूस चांगला भाव मिळवत आहे. सोयाबीनच्या दरात चढ-उतार आलेले आहेत.त्यामुळे शेतकरी या दोन पिकांनाच अधिक पसंती देतील. शिवाय या पिकांऐवजी चांगले पर्यायसुद्धा शेतकऱ्यांसमोर नाहीत. याबाबी लक्षात घेत नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पेरणीयोग्य चार लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सोयाबीनची लागवड दोन लाख २० हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. याशिवाय कपाशीचे एक लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र अपेक्षित धरले जात आहे. ➡️या दोन प्रमुख पिकांशिवाय तूर ५५ हजार, मूग २३ हजार, उडीद १६ हजार, ज्वारी सहा हजार, मका २५०, बाजरा २००, तीळ १० हेक्टरवर पेरणी नियोजित करण्यात आली. ➡️कापूस क्षेत्रात वाढीची चिन्हे : या संपूर्ण हंगामात कापसाने आजवरचा सर्वाधिक दर मिळवला आहे. सरासरी ९ ते १० हजार रुपये क्विंटल दर मिळाला. सर्वाधिक दर १२ हजारांवर पोचला होता. हे पाहता शेतकरी पुन्हा एकदा कापूस लागवडीकडे वळू शकतो. दुसरीकडे बीटी बियाण्याच्‍या दरात झालेली वाढ, खतांचे वाढलेले दर, फवारणीचा खर्च व वेचाईची मजुरी याचा विचारसुद्धा शेतकरी लागवडीपूर्वी करू शकतात. ➡️सोयाबीन अग्रस्थानी टिकून राहील : गेल्या काही वर्षात जिल्ह्यात सोयाबीन हेच प्रमुख खरिपाचे पीक राहिलेले आहे. यावर्षी सुमारे सव्वा दोन लाख हेक्टरपर्यंत लागवड शक्य आहे. सोयाबीनलाही सात हजारांपर्यंत दर मिळत आहेत. काही शेतकऱ्यांना उत्पादनही चांगले आले होते. यामुळे सोयाबीन लागवडीला शेतकऱ्यांची पसंती टिकून आहे. ➡️असे लागेल बियाणे : सोयाबीन १ लाख ६५ हजार क्विंटल, तूर २८८८, मूग ९९४, उडीद ७६८, ज्वारी ४५०, मका ३८, बाजरा ५, तीळ १, कपाशी ४०००क्विंटल बियाणे लागेल. याबाबत कृषी विभागाकडून आयुक्तालयाकडे मागणी करण्यात आली आहे. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
3
इतर लेख