AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोवन
सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव!
पावसाने ओढ दिल्याने आधीच अडचणीत आलेल्या सोयाबीन उत्पादकांसमोर खोडमाशी नियंत्रणाचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. सेल्सुरा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात सुमारे २५ टक्के सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. कृषी विभागाने ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय सोयाबीनची लागवड करू नये असे आवाहन केले होते त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. वर्धा जिल्ह्यातील काही भागात लागवडीयोग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यात सोयाबीन पीक सध्या अंकुरण होऊन सुमारे पंधरा ते वीस दिवस झाले आहे. काही भागात पाच ते सहा इंचापेक्षा जास्त याप्रमाणे पिकाची वाढ झाली आहे. असे असले तरी पंधरा ते वीस दिवस असा अंकुरण कालावधी झालेले पीक सध्या अचानक पिवळे पडत आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांशी संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या या संदर्भाने तक्रारी वाढल्याने कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञांनी जिल्ह्यात विशेष सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात २५ टक्के सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा विचार केल्यास वर्धा सेलू व देवळी तालुक्यातील सोयाबीन पिकावर खोडमाशीचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचे दिसून आले आहे. या तालुक्यात ३० ते ३५ टक्के तर हिंगणघाट, आर्वी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर तालुक्यातील सोयाबीन पिकावर १५ ते २० टक्के प्रादुर्भाव झाल्याचे देखील सर्वेक्षणात पुढे आले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनी योग्य खबरदारी घेत तज्ञांच्या मार्गदर्शनात उपाययोजनांचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक नुकसान पातळी नुसार लेबल क्‍लेम असलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी. प्रतिक्रया खोडमाशीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिसून आला आहे. पीक १० ते १२ दिवसांचे असताना पाणी पिवळी पडतात. अशा शेतातील सात ते आठ झाडे उपटून खालच्या बाजूस उभा चिरा मारल्यास किडीमुळे झालेले नुकसान दिसून येते. पाणी पिवळे असल्याने शेतकऱ्यांना अन्नद्रव्यांची कमतरता आहे असे वाटते. त्यानुसार ते उपाययोजना करतात. परंतु खोडमाशीमुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा थांबत असल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडतात. शेतकऱ्यांनी सापळे व शिफारशीत कीडनाशकांचा वापर करून प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी नियंत्रण मिळविले पाहिजे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
10