agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीनवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीनवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण !
🌱सोयाबीन पिकावर सद्यस्थितीत शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. वातावरण ढगाळ असताना या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. सुरवातीस अंड्यातून बाहेर पडलेली लहान अळी सोयाबीनची कोवळी पाने खाते. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर कळ्या, फुले खाते. नंतर शेंगांना छिद्र पाडून आत शिरते. शेंगेतील अपरिपक्व तसेच परिपक्व झालेले दाणे खाऊन टाकते. प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येते. नियंत्रणासाठी फ्लूबेन्डीअमाईन 39.35% @ 50 मिली/एकर फवारणी करावे.. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
1
इतर लेख