बाजारभावअ‍ॅग्रोवन
सोयाबीनला प्रतिक्विंटल ४८०० ते ७००० रुपये दर!
➡️ मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये सोयाबीनची आवक होत असून, हंगामही लांबला आहे. गेल्या सप्ताहात देशभरातील बाजारांत एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनला ४८०० ते ७००० रुपये दर मिळाला. तर सरासरी दर्जाच्या सोयाबीनला ४५०० ते ५४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. सध्या सोयाबीनमध्ये ओलावा जास्त असल्याने प्रक्रिया प्लांट्सना क्रशिंगसाठी माल मिळत नसल्याने दर्जेदार सोयाबीनसाठी शोधाशोध करावी लागत आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली. ➡️ देशातील सोयाबीन उत्पादक महत्त्वाच्या राज्यांमध्ये आवक सुरू झाली असून, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आवक वाढत आहे. तर कर्नाटक आणि गुजरात राज्यांतही नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. यंदा सोयाबीन लागवडीला उशीर झाल्याने माल काढणीही उशिरा होत आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीन आवकेचा मुख्य हंगाम किमान १५ दिवस पुढे ढकलला आहे. त्यातच अनेक भागांत पाऊस होत असल्याने तयार सोयाबीन काढणीत व्यत्यय येत आहे. तसेच काही भागांत नुकसान झाल्याची माहितीही मिळत आहे. त्यामुळे सध्या बाजारात आवक कमीच आहे. ➡️ सोयाबीनची काढणीची गती वाढल्यानंतर खरा आवकेचा हंगाम सुरू होईल. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार होत आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात काही प्रमाणात पाहायला मिळत आहे. सोयाबीनमधील ओलावा कमी झाल्यानंतर गुणवत्तापूर्ण माल बाजारात दाखल झाल्यानंतर खरी दराची स्थिती स्पष्ट होईल. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
3
इतर लेख