AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीनला अच्छे दिन; शेतकऱ्यांना मिळाला गेल्या दहा वर्षातील सर्वात उच्चांकी दर!
कृषी वार्तामहाराष्ट्र टाइम्स.कॉम,
सोयाबीनला अच्छे दिन; शेतकऱ्यांना मिळाला गेल्या दहा वर्षातील सर्वात उच्चांकी दर!
➡️ सध्या सोयाबीनचे दर कडाडले आहेत. प्रतिक्विंटल दर सहा हजारच्या वर गेले आहेत. आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. ➡️ वाशिमः वाशिमच्या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला गेल्या दहा वर्षातील सर्वात उच्चांक दर मिळला आहे. वाशिमच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाशीमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला ६५०० प्रती क्विंटल उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळेच आजचा उच्चांकी भाव पाहून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. ➡️ करोनाच सावट मागील अनेक दिवसात शेतकऱ्यांना मोठ्या अतिवृष्टी, कीड अळीचा प्रादुर्भाव यांसारखी नैसर्गिक संकट सोयाबिन उत्पादन शेतकऱ्यांच्या सोबतीला होती याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर झाला अनेक शेतकऱ्यांना उत्पादनाची सरासरी ही गाठता आली नव्हती. ➡️ चार दिवसानंतर वाशिम बाजार समिती उघडली होती त्याच मार्च नंतर आजचा पहिला सोमवार होता आज सरासरी सहा हजारापासून सहा हजार पाचशेचे उच्चांकी दर शेतकऱ्यांना मिळाले आहेत. वाशीमच्या बाजार समितीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी गर्दी आज दिसून आली. आज सरासरी पंधराशे क्विंटलची आवक होती. ➡️ आगामी खरीप हंगाम दोन महिन्यांवर आला आहे. अशा स्थितीत शेतकरी बी-बियाणे, मशागत व इतर कामांसाठी पैशांची जुळवाजुळव करीत आहे. अशा स्थितीत चांगले सोयाबीन बियाण्याच्या दृष्टीने खरेदीकडे एक कल दिसून येत आहे. बाजार पेठेत सोयाबीनची आवक जरी कमी असली तरी बाजारपेठेत सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने येत्या हंगामात लागवडीच्या दृष्टीने ही परिस्थिती पोषक वातावरण बनवत असल्याच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत. ➡️ यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी झालेले आहे. तर आता बाजारात सोयाबीनची आवक सुद्धा कमी होत आहे. दुसरीकडे तेलाचे दर वाढले. अशा स्थितीत सोयाबीनला मागणी आली आहे. त्यातून बाजारात सोयाबीन चांगल्या दराने विकत आहे. आज रोजी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीध्ये शेतकऱ्यांना सहा हजार पाचशे रुपये भाव मागील दहा वर्षापासून आतापर्यंत असा भाव मिळाला नाही तो भाव मिळाला त्यामुळे शेतकरी आनंदित आहे, अशी भावना सोयाबीन व्यापारी हरिओम भोयर यांनी व्यक्त केली आहे. संदर्भ:- महाराष्ट्र टाइम्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
4