AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीनमधील तणनियंत्रण व घ्यावयाच्या दक्षता
गुरु ज्ञानAgrostar
सोयाबीनमधील तणनियंत्रण व घ्यावयाच्या दक्षता
🌱सोयाबीन पिकामध्ये रासायनिक तणनाशकांचा वापर करताना घ्यावयाची काळजी सोयाबीन पिकामध्ये तणनियंत्रण करण्यासाठी खुरपणी केली जाते. पण मजुरांचा अभाव आणि वेळेची बचत यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक तणनाशकाचा वापर करतात. परंतु तणनाशकांच्या वापराबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे तणांचे नियंत्रण होणे कठीण जाते उलट त्याचा विपरीत परिणाम आपल्या पिकांवर होतो. यासाठी सोयाबीन पिकात तणनाशकांचा वापर करताना त्याबद्दल पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. पीक लागवडीनंतर तण उगवणीनंतर चे तणनाशक ❖ पीक लागवडीनंतर तण उगवणीनंतर वापरण्यात येणारी तणनाशके व त्यांचे प्रमाण 1. इमाझेथापीर 70% डब्ल्यूजी घटक असणारे पॅराशूट ईझी तणनाशक @ 40 ग्रॅम प्रति एकर 2. इमाझामॉक्स 35% + इमाझेथापायरा 35% डब्ल्यूजी घटक असणारे मॉडेस्टी तणनाशक @ 40 ग्रॅम प्रति एकर 3. इमाझेथापीर 10% एसएल घटक असणारे पॅराशूट तणनाशक @400 मिली प्रति एकर 4. सोडियम अॅसिफ्लुओर्फेन 16.5% + क्लोडिनाफॉप प्रोपार्गिल 8% ईसी घटक असणारे हॉटशुअर तणनाशक @400 मिली प्रति एकर ❖ वरीलपैकी कोणत्याही एका तणनाशकाचा वापर करून सोयाबीन पिकातील तण नियंत्रण करावे सोयाबीन पिकात तण उगवणीनंतर तणनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी ❖ सोयाबीन पेरणीनंतर साधारणतः 21 ते 30 दिवसांमध्ये तण उगवणीनंतरचे तणनाशक वापरावे. ❖ तण उगवणीनंतर चे तणनाशक वापरताना तणांची अवस्था 2 ते 4 पानांची असावी. त्यापेक्षा जास्त मोठे तण असल्यास नियंत्रण मिळणे कठीण जाते. ❖ तणनाशक फवारणी करतांना जमिनीत पुरेशी ओल असावी ❖ फवारणी करताना हवा शांत असावी तसेच ढगाळ वातावरणात फवारणी करू नये ❖ पाऊस न येण्याची शक्यता (किमान 2 ते 4 तास) लक्षात घेऊनच फवारणी करावी. ❖ तणनाशक फवारणी साठी स्वतंत्र नॅपसॅक पंप असावा तसेच फ्लॅट पॅन अथवा फ्लड जेट नोझल चा वापर करावा ❖ फवारणीसाठी वापरण्याचे पाणी स्वच्छ असावे ❖ फवारणीसाठी प्रति एकर 150 - 200 लिटर पाणी वापरावे ❖ शिफारस केलेली तणनाशके सोयाबीन पिकासाठी दिलेल्या मात्रेमध्ये, दिलेल्या वेळी आणि दिलेल्या पद्धतीने वापरावीत. ❖ फवारणी करताना संरक्षित किट चा वापर करावा. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
22