AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीनच्या दरामध्ये तेजी!
समाचारअ‍ॅग्रोवन
सोयाबीनच्या दरामध्ये तेजी!
➡️गेले काही दिवस दबावात असलेले सोयाबीनचे दर आता वाढू लागले आहेत. या आठवड्याची सुरुवात वाढीव दराने झाली असून, यात आणखी वाढीची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी वाशीममध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन ६७०० तर अकोट बाजार समितीत ६५०० रुपयांपर्यंत विक्री झाली. ➡️अकोला बाजार समितीत कमाल दर ६७८५ रुपये, तर खामगावमध्ये चांगल्या प्रतीचे सोयाबीन ६४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. प्रामुख्याने बियाणे कंपन्यांकडून खरेदी केली जात असल्याने हे दर वाढल्याची एक शक्यता व्यक्त होत आहे. ➡️गेले काही दिवस सोयाबीनच्या घसरलेल्या दरांमुळे चिंता निर्माण झाली होती. दिवाळीच्या पर्वात हे दर घसरल्याने खेडा खरेदी अवघी ४५०० रुपयांपर्यंत खाली आली होती. बाजार समित्यांमध्येही ५००० ते ५५०० दरम्यान प्रति क्विंटलला दर मिळत होता. दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री काहीसी रोखून धरली होती. ➡️दरम्यान प्लँटधारकांना मोठ्या प्रमाणात सोयाबीन हवी असते. त्या तुलनेत आवक मोठी नसल्याने दरवाढ होऊ लागली आहे. दरात वाढ झाल्याने आता दिवाळीनंतर चांगल्या प्रतीचे सोयाबीन बाजारात येऊ लागले आहे. ➡️आगामी हंगामासाठी बियाणे म्हणून शेतकऱ्यांना विक्री केले जाणारे सोयाबीन कंपन्यांकडून सध्या विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी केले जात आहे. यामुळेच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये तेजीचे दिवस सुरू आहेत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
54
4