सोन्या पेक्षा हि महाग आहे हे 'फळ'!
नई खेती नया किसानलोकमत
सोन्या पेक्षा हि महाग आहे हे 'फळ'!
➡️आपल्याकडे कांद्याचे भाव जरा वाढले तर सगळीकडे चर्चा सुरु होते . पण जगात फळ किती महाग विकली जातील याचा कधी विचार केला आहे का ? आपण सर्वांनी सफरचंद , संत्री , द्राक्षे , आंबा खाल्ला आहे , पण लाखो रुपये किमतीचे फळ तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महाग फळ कधी खाल्लं आणि त्याची किंमत काय असेल ? कदाचित ते १०० ते जास्तीत जास्त वे हजार रुपयांपर्यंत असेल . ➡️पण एखाद्या फळाची किंमत लाखो रुपये असेल तर? सोन्याच्या किमतीपेक्षा महाग फळ जगात अनेक धक्कादायक घटना घडत असतात , ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल . ➡️फॅन्सी फळे खाण्याची क्रेझही काही लोकांमध्ये दिसून येते , ज्याची किंमत १०० रुपयांपासून ते जास्तित जास्त १ हजार रुपयांपर्यंत असू शकते . मात्र , आता आम्ही तुम्हाला अशा एका फळाबद्दल सांगणार आहोत , ज्याची किंमत लाखोंत आहे . हे फळ खाण्यापूर्वी तुम्ही नक्कीच विचार कराल की , आपण हे फळ घेण्यापेक्षा सोन्यात गुंतवणूक करू शकतो . होय , हे महागडे फळ खरेदी करण्यासाठी लोकांनी लिलावात भाग घ्यावा लागतो. ➡️जपानचं सर्वात महागडं खरबुज या फळाला युबरी खरबूज म्हणतात , हे आपल्याकडील खरबूजासारखंच आहे . हे जगातील सर्वात महाग फळ असल्याचे सांगितले जाते. हे फळ फक्त जपानमध्ये विकलं जातं आणि फक्त श्रीमंत लोकच ते विकत घेऊ शकतात. ➡️जपानचे युबरी खरबूज केवळ जपानच्या युबारी प्रदेशात पिकवलं जातं . यापैकी दोन युबरी कस्तुरी खरबूजांनी 2019 मध्ये विक्रमी किंमत मिळवली , जेव्हा त्यांचा $ 45,000 म्हणजे अंदाजे 33,00,000 रुपये . युबरी सामान्य खरबुजासारखंच दिसतं , पण त्याची चव खूप गोड असते , ते आतून केशरी रंगाचं असतं . अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-लोकमत हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
9
इतर लेख