AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोनं बँकेत ठेवून पैसे कमावण्याची संधी!
समाचारTV9 Marathi
सोनं बँकेत ठेवून पैसे कमावण्याची संधी!
➡️ अलीकडच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असूनही पारंपरिक विचारसरणीचे भारतीय लोक सोन्यात गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. प्रत्येक सणाला थोडंफार सोनं खरेदी केलं जातं. मात्र, यापैकी बहुतांश सोनं वर्षानुवर्षे कपाटाच्या लॉकरमध्ये पडून राहते. त्यावर कोणताही परतावा मिळत नाही. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक काहीप्रमाणात डेड इन्व्हेस्टमेंट मानली जाते.मात्र, आता पंजाब नॅशनल बँकेने घरातील सोन्यावर पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. पंजाब नशनल बँकेच्या गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम मध्ये सोनं ठेवून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. किमान किती सोनं जमा करावं लागेल? ➡️ पंजाब नशनल बँकेच्या सोने चलनीकरण योजनेतंर्गत गुंतवणूक करायची ठरवली तर तुमच्या सोन्याच्या दागिन्यांसाठी वेगळे बँक लॉकर खरेदी करण्याची गरज उरणार नाही. तसेच तुम्हाला ठराविक व्याजही मिळत राहील. या योजनेत तुम्ही अगदी एक तोळा सोनेही गुंतवू शकता. ➡️ पंजाब नशनल बँकेच्या गोल्ड मॉनिटायझेशन योजना तीन प्रकार आहेत. शॉर्ट टर्म बँक डिपॉझिटमध्ये १ ते ३ वर्षांच्या कालावधीसाठी तुम्ही सोनं बँकेत गुंतवू शकता. तर मध्यम आणि दीर्घकालीन गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम चा कालावधी अनुक्रमे ५ ते ७ वर्षे आणि १२ ते १५ वर्षे इतका आहे. किती व्याज मिळणार? ➡️ पंजाब नशनल बँकेच्या या योजनेत एका वर्षासाठी ०.५० टक्के ते ०.७५ टक्के इतके व्याज मिळेल. एका वर्षापेक्षा जास्त पण दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी व्याजदर २.२५ टक्के इतका राहील. दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी २.५० टक्के इतके व्याज मिळेल. गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ध्ये तुम्ही सोन्याची नाणी, वळी आणि दागिने गुंतवू शकता. योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना अर्ज, ओळखपत्र, केवायसी आणि इन्व्हेंटरी फॉर्म भरावा लागेल. पैसे कधी काढू शकता? ➡️ शॉर्ट टर्म बँक डिपॉझिटमध्ये तुम्ही मुदतीपूर्वी सोनं बँकेतून काढल्यास त्यावर दंड भरावा लागेल. एका वर्षाच्या आत तुम्ही सोनं काढल्यास त्यावर कोणतेही व्याज मिळणार नाही. त्यावर 0.15 टक्के इतके व्याज लागेल. तसेच सोन्याचा परतावा पैशाच्या स्वरुपात किंवा सोन्याच्या स्वरुपातच द्यावा, यासाठी बँकेवर कोणतेही बंधन राहणार नाही. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-TV9Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
7
इतर लेख