AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सेंद्रिय शेतीसाठी जबरदस्त मार्गदर्शन!
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सेंद्रिय शेतीसाठी जबरदस्त मार्गदर्शन!
सेंद्रिय शेती हि काळाची गरज आहे. सेंद्रिय शेती करत असताना पिकातील कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी आपण कोणत्या मित्र बुरशीचा वापर करू शकतो किंवा सेंद्रिय/जैविक कीटकनाशक, बुरशीनाशक घरच्या घरी कसे तयार करावेत याबाबत सदर लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. ट्रायकोडर्मा:👇 ➡️ सेंद्रिय शेतीमध्ये ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीच्या वापराचे फायदे शेतकरी बंधूंना बदलत्या हवामानामुळे बदलत्या पीक पद्धतीमुळे वाढत्या सिंचनामुळे रोगकारक बुरशींची वाढ दिवसेंदिवस वाढत आहे. रोगकारक बुरशींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये मुळ कुज खोड कुज यासारखे रोग आढळून येत आहे, यासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर केल्यास जमिनीतून होणाऱ्या रोगांचे व्यवस्थापन करू शकतो , ट्रायकोडर्मा ही मित्र बुरशी जमिनीतील हानिकारक बुरशीच्या धाग्यांमध्ये विळखा घालून आपले साम्राज्य पसरते व व त्यातील पोषकद्रव्ये शिक्षण फस्त करते ट्रायकोडर्मा ही बुरशी सीन व नावाची प्रतिजैविके निर्माण करते व रोगजन्य बुरशीच्या वाढीला मारक ठरते. जीवामृत👇 ➡️ जीवामृत हे एक प्रकारचे जिवाणूंचे विरजण आहे, सोबतच ते अत्यंत चांगले बुरशीनाशक विषाणू नाशक असल्याने त्याचा फवारणीने बुरशी विषाणू यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येतो. जीवामृत बनवण्याची पद्धत - साहित्य २०० लिटर पाणी + १० किलो देशी गायीचे शेण + ५ ते १० लिटर देशी गायीचे गोमूत्र + २ किलो गुळ + २ किलो बेसन + १ किलो बांधावरची जिवाणू युक्त माती, हे सर्व व्यवस्थित ढवळावे व ४८ तास झाकून ठेवावे. रायझोबियम👇 ➡️ रायझोबियम नत्राचे स्थिरीकरण करते आणि कडधान्य पिकांच्या मुळांना नत्र लवकर उपलब्ध होऊन मुळावर जास्त प्रमाणात गाठी लागतात परिणामी जास्त उत्पादन मिळते. १५ ते २० टक्के उत्पन्न वाढविण्यास मदत करते. पीएसबी👇 ➡️ हे जिवाणू सेंद्रिय शेतीमध्ये यासाठी खूप महत्त्वाचे आहे. याला स्फुरद विरघळणारे जिवाणू खत असे म्हणतात. जमिनीमधील स्फुरद पिकांना मिळवून देण्यासाठी पीएसबी फार महत्त्वपूर्ण आहे. सोयाबीन, तूर, उडीद, मूग यासारख्या महत्वाच्या पिकामध्ये पीएसबी या जिवाणू खताचा वापर केला जातो. या जिवाणूंमुळे जमिनीतील फिक्स झालेला स्फुरद बऱ्याच प्रमाणात विरघळून मिळवून देण्यास कार्य करतात. निंबोळी अर्क👇 ➡️ निंबोळी अर्काचा उपयोग विविध किटक प्रतीबंधक व नियंत्रणासाठी केला जातो उदा. पांढरी माशी, मावा, तुडतुडे इत्यादी. ५% टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत:-👇 ➡️ उन्हाळ्यात निंबोळ्या उपलब्ध असताना त्या जमा कराव्यात या चांगल्या वाळून साफ करून त्याची साठवण करावी फवारणीच्या आदल्या दिवशी निंबोळ्या बारीक कराव्यात असा ५ किलो निंबोळीचा चुरा ९ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी टाकावा . एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा ठेवावा दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्क पातळ कपड्यातून चांगला गाळून घ्यावा. एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे व अर्क एकूण दहा लिटर होईल एवढे पाणी मिसळावे वरील प्रमाणे तयार केलेला १ लिटर अर्क ९ लिटर पाण्यात मिसळून ढवळावा व फवारण्यासाठी वापरावा बीजामृत👇 ➡️ अमृताच्या प्रक्रियेसाठी मुळे उगवण शक्ती वाढते पिकाची वाढ जोमदार होत असल्यास हा अनुभव आहे. ➡️ बीजामृत बनवण्याची पद्धत २० लिटर पाणी, १ किलो देशी गाईचे शेण, १ लिटर गोमूत्र, १०० मिली दूध जिवाणू माती चुना मिसळून हे मिश्रण २० लिटर पाण्यामध्ये चांगले ढवळून घ्यावे. पेरणीपूर्वी या मिश्रणाची बियाण्यावर प्रक्रिया करावी. अमृतपाणी👇 ➡️ अमृतपाणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पावशेर देशी गायीचे तूप, १० किलो शेण, अर्धा किलो मध, दोनशे लिटर पाणी. अमृत पाणी बनवण्याची पद्धत👇 ➡️ १० किलो दहा किलो शेणामध्ये पावशेर तूप व अर्धा किलो मध मिसळून हे मिश्रण २०० लिटर पाण्यामध्ये चांगले ढवळून घ्यावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
12