फळ प्रक्रियाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सुके अंजीर प्रक्रिया
पोषणमुल्यांचा विचार करता अंजीर हे अतिशय उपयुक्त फळ आहे. फेब्रुवारी–मार्च महिन्यात अंजीर फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे भाव कमी मिळून शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. अशावेळी सुके अंजीर तयार केल्यास शेतकऱ्यांना फायदा होवू शकतो. अंजीर सुकविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी व कमी खर्चाची आहे. सुके अंजीर बनविण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
१. प्रथम चांगले पिकलेले अंजीर फळे सुके अंजीर बनविण्यासाठी निवडावीत. २. सुके अंजीर बनविण्यासाठीच्या अंजिर फळांचा टी. एस. एस. १७ टक्कयापेक्षा जास्त असावा. ३. फळांना धुरी देण्यासाठी लाकडी पेटी तयार करून त्यात काढता-घालता येतील अश्या जाळीचे खण करून त्या जाळीवर फळे पसरवून ठेवावीत. ४. खालच्या खणात शेगडी ठेवण्याची सोय असावी. शेगडीत विस्तवाचे निखारे ठेवून त्यावर गंधकाची पूड (१ किलोस ४ ग्रॅम याप्रमाणे) टाकून पेटी बंद करावी. गंधकाच्या धुरीने फळांचा रंग जावून ती पांढरी दिसू लागतात. जास्त धुरी दिल्यास फळे सुकतात तर धुरी न दिल्यास फळे काळी पडतात. गंधकाच्या धुरीमुळे फळांतील बुरशीची वाढ थांबते. ५. धुरी दिल्यानंतर फळे बाहेर काढून स्वच्छ जागी केरकचरा उडणार नाही ह्या बेताने सुकवावीत. ६. साधारण ५ ते ६ दिवसात अंजीर सुकतात. ७. सुकलेले अंजीर हवाबंद पिशवीत बंद करावे व थंड व कोरड्या जागी ठेवावे. • संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
120
0
इतर लेख