AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते असेल तर घर बसल्या भराऑनलाईन पैसे!
कृषी वार्ताtv9marathi
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते असेल तर घर बसल्या भराऑनलाईन पैसे!
➡️ अनेक जण मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पैसे जमा करतात. तसेच बरेच जण कर बचतीवर आपल्या मुलींच्या नावे पैसेही जमा करीत आहेत. या योजनेत एका वर्षात किमान २५० ​रुपये जमा करावे लागतात. कोरोनाचे संकट सतत वाढत असून, घरात राहणे सुरक्षित आहे. ➡️ अशा परिस्थितीत आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्याचा हप्ता भरणे धोकादायक आहे. म्हणूनच तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत पैसे जमा करू शकता. ➡️ कोरोनाच्या संकटाच्या वेळीही आपण घराबाहेर पडणे टाळावे आणि आपले काम ऑनलाईन माध्यमातून करण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये या योजनेत पैसे जमा करणे देखील समाविष्ट आहे. ऑनलाईन पैसे कसे ठेवायचे हे जाणून घ्या…ऑनलाईन पैसे कसे जमा करावे? जर आपण पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी खाते उघडले असेल तर आपण घरात बसून दरमहा पैसे त्यात साठवू शकता. खात्यात पैसे जमा करणे खूप सोपे आहे. यासाठी प्रथम आपले बँक खाते IPPB खात्याशी जोडा. यानंतर डीओपी प्रॉडक्टस वर जा, तिथे तुम्हाला सुकन्या समृद्धी खाते दिसेल आणि तुम्ही ते सिलेक्ट करा. आपला SSY खाते क्रमांक आणि नंतर DOP ग्राहक आयडी टाईप करा. यानंतर सामान्य पेमेंट प्रक्रियेप्रमाणे हप्ता कालावधी आणि रक्कम निवडा. तसेच प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून आपल्या खात्यात पैसे हस्तांतरित होतील. शिल्लक कशी तपासायची? ➡️ सुकन्या समृद्धी खात्यात शिल्लक रक्कम तपासण्याचे दोन मार्ग आहेत. ऑफलाईन मोड आणि ऑनलाईन मोड. जर आपण पोस्ट ऑफिसद्वारे खाते उघडले असेल तर आपल्याला ऑफलाईनद्वारे शिल्लक तपासावी लागेल. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा पासबुक अपडेट करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला शिल्लक रकमेची माहिती मिळेल. त्याचबरोबर ऑनलाईन शिल्लक तपासण्यासाठी तुम्हाला नेट बँकिंगद्वारेही ते मिळू शकेल. यासाठी तुम्हाला नेटबँकिंगमध्ये लॉगिन करावे लागेल, जिथे तुम्हाला या खात्यातील शिल्लक दिसू शकेल. ही योजना काय आहे? ➡️ सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही किमान २५० आणि जास्तीत जास्त १.५० लाख रुपये जमा करू शकता. त्याचा मॅच्युरिटी कालावधी २१ वर्षे आहे, परंतु पालकांना त्यामध्ये केवळ १४ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत तुम्ही जितकी गुंतवणूक केली असेल तितकाच मॅच्युरिटीवर तुम्हाला तीन पट नफा मिळेल. मुलगी २१ वर्षांच्या झाल्यावर किंवा तिचे वय १८ वर्षांनंतर लग्न झाल्याशिवाय हे खाते चालवले जाऊ शकते. सुकन्या समृद्धी खाते देशातील कोठेही हस्तांतरित केले जाऊ शकते. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -TV9 Marathi, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
9
1
इतर लेख