AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgrostar India
सीताफळ लागवडीपासूनचे योग्य छाटणी व्यवस्थापन!
मित्रांनो, आज आपण अनुभवी आणि प्रगतशील महिला शेतकरी 'स्वप्नाताई मगर' यांच्या मार्गदर्शनाद्वारे सीताफळ पिकामध्ये लागवडीपासून छाटणीचे नियोजन कसे करावे हे खालील लेख तसेच व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. पहिली छाटणी -👇 ➡️ जर लागवड १ ते १५ जुने पर्यंतची असेल तर पहिली छाटणी २५ ते ३० दिवसानानंतर म्हणजे तुमचे रोप लागवड करताना २ फुटांचे पाहिजे म्हणजे पहिली छाटणी करतेवेळी दीड फुटांवर ब्राउन रंगाची काडी तयार झाली पाहिजे मगच आपल्याला दीड फुटावर पहिली छाटणी करता येते, छाटणी झाल्यावर धानुकोप (कॉपर ऑक्सिक्लोराइड ५०%) नावाच्या बुरशीनाशकाची @४० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. दुसरी छाटणी -👇 ➡️ पहिली छाटणी केल्यानंतर त्या ब्रॅंचेस (फांद्या) ३० ऑगस्ट पर्यंत दोन फुटांच्या होतात नंतर दुसरी छाटणी १ ते १० सप्टेंबर च्या दरम्यान आपण घेऊ शकतो म्हणजे रोपाच्या एका सिंगल काडीला पहिल्या छाटणीनंतर २ ते ३ ब्रॅंचेस येतात त्यांना सप्टेंबरमध्ये १० ते ११ इंचावर कट करावे. १० ते ११ इंचावर ब्राउन रंगाची काडी तयार झाल्यावरच छाटणी घेणे योग्य. छाटणीनंतर त्या ब्रॅंचेस जानेवारी पर्यंत वाढू द्याव्यात. दुसरी छाटणी केल्यावर डिसेंबरमध्ये झाडाची वाढ बंद होते. जानेवारी मध्ये झाडाची पानगळ होते. छाटणी झाल्यावर धानुकोप (कॉपर ऑक्सिक्लोराइड ५०%) नावाच्या बुरशीनाशकाची @४० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तिसरी छाटणी -👇 ➡️ जेव्हा झाडाची पानगळ १ फुटापर्यंत होते तेव्हा आपल्याला तिसरी छाटणी घेता येते. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तिसरी छाटणी १० इंचावर घ्यावी. छाटणी झाल्यावर धानुकोप (कॉपर ऑक्सिक्लोराइड ५०%) नावाच्या बुरशीनाशकाची @४० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. चौथी छाटणी -👇 ➡️ तिसऱ्या छाटणीनंतर त्या ब्रॅंचेस ३० एप्रिल पर्यंत च वाढवायच्या आहेत जो पर्यंत १ फुटापर्यंत ब्राउन रंगाची व करंगळीच्या आकाराची काडी तयार होत नाही तोपर्यंत व १ ते २० मे पर्यंत बाग ताणावर सोडावी लागते. छाटणी झाल्यावर धानुकोप (कॉपर ऑक्सिक्लोराइड ५०%) नावाच्या बुरशीनाशकाची @४० ग्रॅम प्रति १५ लिटर याप्रमाणे फवारणी करावी. पाचवी छाटणी - 👇 ➡️ २० मे पर्यंत ताणावर सोडल्यानंतर दोन वर्षाच्या बागेची बहाराची छाटणी करता येते. ती फक्त्त ८ इंचावर बहाराची छाटणी घेणे आवश्यक. छाटणी झाल्यावर धानुकोप (कॉपर ऑक्सिक्लोराइड ५०%) नावाच्या बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १५ लिटर याप्रमाणे फवारणी करावी. संबंधित उत्पादने - AGS-CP-150 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
16