AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सीताफळ पिकावरील पिठ्या ढेकूण नियंत्रण!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सीताफळ पिकावरील पिठ्या ढेकूण नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, सिताफळ बागेत पिठ्या ढेकूण म्हणजेच मिली बग किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन महिला प्रगतशील शेतकरी स्वप्ना मगर यांच्या द्वारे जाणून घेऊया. ➡️ हि कीड झाडाच्या सालीच्या खाली फळांच्या आणि फांद्यांच्या फटीत राहते चिवट कापसासारख्या पांढऱ्या पदार्थांच्या आवरणामध्ये ती अंडी घालते ➡️ पूर्ण वाढलेल्या किडीच्या शरीरावरतीही मेणचट पांढऱ्या रंगाचे आवरण असते. ➡️ हि कीड फळांचे खूप मोट्या प्रमाणात नुकसान करते , त्यामुळे फळांची गुणवत्ता खराब होते. जैविक नियंत्रण - फवारणी ➡️ व्हर्टिसिलिअम लेकॅनी हि पावडर प्रति लिटर १ किलो + १ लिटर दूध - २०० लिटर पाण्यात मिसळावे , १ दिवस अगोदर भिजत घालावे . ➡️ हि फवारणी घेण्याअगोदर ८ ते १० दिवस कोणतेही बुरशीनाशक फवारणी घेऊ नये. तसेच फवारणी घेतेवेळी जमीन ओली असावी आणि शक्य तो सायंकाळी फवारणीसाठी वेळ निवडावी तेव्हा हि बुरशी काम करते. ➡️ हि फवारणी जमिनीवर व झाडांवर पण घ्यावी. रासायनिक नियंत्रण - फवारणी ➡️ क्विनलफॉस ३० मिली / १५ लिटर किंवा ➡️ वेटसील प्लस स्टिकर - ५ मिली / १५ लिटर फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
9