AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सीताफळीवरील पिठ्या ढेकूण कीड!
गुरु ज्ञानAgrostar
सीताफळीवरील पिठ्या ढेकूण कीड!
🌱मिलीबग या किडीलाच पिठ्या ढेकूण नावानी ओळखले जाते. सीताफळ फळपिकावर पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पूर्ण वाढलेल्या किडीच्या शरीरावर मेणचट पांढुरक्या रंगाचे आवरण असते. ही कीड पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि फळे यातून रस शोषण करते. 🌱प्रादुर्भाव ग्रस्त झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. नवीन फुटींची व पानांची वाढ खुंटते. फळांची वाढ अयोग्य होऊन आकार वेडावाकडा होतो तसेच ही कीड शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ स्त्रवते, ज्याच्यावर काळी बुरशी वाढते. परिणामी पाने, फळे काळी पडतात आणि याचा परिणाम फळांच्या बाजारभावावरती होऊन उत्पादनावरती होतो. होणारे नुकसान टाळण्यासाठी बुप्रोफेझिन 25% SC घटक असणारे कीटकनाशक @ 120 ग्राम प्रति एकर घेऊन चांगल्या प्रभावासाठी स्टिकर सोबत फवारणी करावी. 🌱संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
7
इतर लेख