सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सीताफळामधील फळमाशी वर प्रभावी उपाय!
➡️शेतकरी बंधूंनो, सीताफळ पिकामध्ये सद्य परिस्थितीमध्ये फळमाशी या किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.मागील वर्षी सततच्या पावसामुळे हा प्रादुर्भाव वाढलेला होता आणि याचा परिणाम फळांच्या गुणवत्तेवर दिसून येतो. यावरील प्रभावी उपाय याविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन महिला प्रगतशील शेतकरी स्वप्ना मगर यांच्या द्वारे जाणून घेऊया.
जीवन क्रम
➡️फळमाशी पिवळसर सोनेरी रंगाची असते आकाराने नर माशी पेक्षा मादी थोडी मोठी असते.
काढणीस तयार झालेल्या ज्यामध्ये गोडी असते त्या फळांच्या सालीखाली पतंग अंडी घालतो.एका पुंजक्यात सुमारे 100 ते 300 अंडी असतात.
➡️अळी अवस्था 10 ते 15 दिवसांची असते.पूर्ण वाढलेल्या आळ्या जमिनीत कोषावस्थेत जातात.
➡️कोषावस्था आठ ते 12 दिवसांची असते.कोश मधून प्रौढ कीटक बाहेर येऊन पुन्हा अंडी देतात अशा प्रकारे सात ते आठ पिढ्या पूर्ण होतात.
नुकसान
➡️फळातील गरावर आळी उपजीविका करते.
त्यामुळे फळे कुजतात आणि गळून पडतात.
प्रादुर्भावग्रस्त फळांची गुणवत्ता कमी होते.
ती खाण्यायोग्य राहत नाहीत.
नियंत्रण
➡️शेतामध्ये फळमाशी सापळे पाच ते सहा लावणे गरजेचे आहे.
➡️फळमाशी नियंत्रणासाठी किटकनाशकांची फवारणी वेळोवेळी घेणे गरजेचे आहे.
रासायनिक नियंत्रण फवारणी
डेसिज 100 ( डेल्टामेथ्रीन १०० ईसी )
प्रमाण – 1.25 मिली / लिटर
हेलिओक्स ( प्रोफेनोफॉस ४० % + साइपरमेथ्रिन ४ % ईसी)
प्रमाण - 2 मिली / लिटर
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.