अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
सिताफळामधील शेंडे मर नियंत्रण!
शेंडेमर या रोगामुळे झाडाच्या फांद्या पालवी टोकाकडून वाळत जाते याला इंग्रजीमध्ये डायबॅक म्हणतात.
फांदी शेंडयाकडे मरते या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पावसाळयात तसेच बागेत जास्त पाणी साचून राहिल्यास होतो.
रोगाचे पहिले लक्षण म्हणजे लागण झालेल्या भागांवर सुक्ष्म काळे डाग पडतात.
शेंड्याची फूट २ ते ३ इंच काळी पडते
या डागांमुळे पेशी मरतात व शेंडयाकडून फांदी वाळते काही वेळा फांदीमधून डिंक पाझरतो तर काही वेळेस फांदीच्या सालीला भेगा पडतात व खोड उघडे पडून काळे होते.याच्या नियंत्रणासाठी मेन्डोज ( मॅंकोझेब ६३ % + कार्बेन्डाझिम १२%) ३० ग्रॅम / १५ लिटर प्रमाणे फवारणी करावी.
संबंधित उत्पादने - AGS-CP-601
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.