AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काढणार कर्ज
कृषि वार्तालोकसत्ता
सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काढणार कर्ज
राज्यातील अपूर्ण ५२ सिंचन संकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी दीर्घ मुदतीचे १५ हजार कोटी रूपयांचे कर्ज घेण्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यातून सुमारे २.९० लाख हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होणार असून ८९१ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध होईन. सिंचन प्रकल्पांना गती देण्याचा सरकारचा प्रयत्न असून पुढील पिढी दुष्काळ पाहणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर केले आहे. राज्यात सध्या ३१३ प्रकल्प अर्धवट स्थितीत असून ते पूर्ण करण्यासाठी सुमारे ९३ हजार ५७० कोटी रूपयांची आवश्यकता आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात जलसंपदा विभागाला ९-१० हजार कोटी रूपयांपर्यंत निधी मिळतो व अन्य खर्च वगळून प्रकल्पांच्या कामासाठी सुमारे साडेसात हजार कोटी रूपये उपलब्ध होतात. हे प्रकल्प अनेक वर्ष रखडल्याने महागाईवाढ होते व प्रकल्पांच्या वाढीव खर्चापोटीच खात्याला मिळणारा निधी खर्च होतो. संदर्भ – लोकसत्ता, ८ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
6
0